Post Language

Saturday, May 17, 2025

GC वर स्वारी

 







(शूर आम्ही सरदार च्या चालीवर)


GC आम्ही चढणार आम्हांला काय कुणाची भीती (२)

ऊन, धुके अन पावसामधूनी चालत राहू पुढती    

GC आम्ही चढणार आम्हांला काय कुणाची भीती 


दर शनिवारी उठून निघावं, हेच आम्हाला ठावं    (२)

चडून उतरावं, उतरून चढावं हेच आम्हाला ठावं 


GC  साठी सारे  विसरू झोप आराम अन नाती 

ऊन, धुके अन पावसामधूनी चालत राहू पुढती  

GC आम्ही चढणार आम्हांला काय कुणाची भीती 



कंबर घोटे गुडघे दुखू दे, फरक ना पडतो आम्हां  (२)

पाठ धरो वा मान लचकू दे ध्यास एक असावा 

GC  वरती करूया स्वारी निधडी आमुची छाती 


ऊन, धुके अन पावसामधूनी चालत राहू पुढती  

GC आम्ही चढणार आम्हांला काय कुणाची भीती 


काठी टोपी बॅकपॅकही सज्ज असावी खाशी   (२)

Tailwind ची साथ धरावी, चहाने यावी उभारी 

खजूर मेवा सुका फराळा, चटणी सँडविच पोटी 


ऊन, धुके अन पावसामधूनी चालत राहू पुढती  

GC आम्ही चढणार आम्हांला काय कुणाची भीती 

 2022



No comments:

Post a Comment

About Me

Writing has been one of my hobbies since childhood. My poems and pros are a true expression of my thoughts and feelings at that time. My first language is Marathi, so you will find a lot of posts in Marathi. I am planning to add a few more posts monthly. You can subscribe by using your email address. Thanks for visiting!