एकलव्याच्या अंगठ्यापुढ़े फिके पडलेले
अजानुबाहु
जिंकून आणलेल्या द्रौपदीला
भावांमध्ये वाटताना
हृदयात वहात असलेली नपुंसक
भळभळती ज़ख़म,
तिचा घोर अपमान बघताना
खोल खोल गेलेली. विवस्त्र.
बृहन्नडेच्या रूपात मिळालेली स्वस्थता
शांतता, समाधान.
गांडीव धनुष्याला सुटलेला कंप
पराभवाच्या, मरणाच्या भीतीने
लोळागोळा झालेले मन
कर्णाची कवच कुण्डले ओरबाडून घेऊन
कृष्णअभया मागे लपून
अभिमन्यूचा बळी देऊन
मिळवलेला विजय
सगळ्याचा दारूण शेवट
अपरंपार दुःख, घनघोर निराशा,
बेचिराख देशावर राज्य करण्याचा हक्क?
की नाईलाज?
अमिता खरे
10/30/22
No comments:
Post a Comment