ओळखीच्या खुणा विसरलेले,
परका भाव दाखवत लांब ढकलणारे रस्ते
विस्मरणाचा गंज चढलेले पूल
तुटत चाललेले नातं, गावाशी.
बुचकळलेली, गोंधळलेली
माहितीच्या गल्ल्यामधून
हरवलेली मी
प्रत्येक धागा तुटताना
एकएक वीणउसवताना
छिन्न करणारी वेदना
भळभळ वाहणारे मन
यासगळ्याचा अर्थ लावायचा
वांझोटा प्रयास
जीव पिळून वेशीवर टांगावा
आणि बनावा भुताचा घास
हे असे झाले तरी कधी?
माझं झुरणं आणि त्याने नाकारणं?
01/15/20
No comments:
Post a Comment