सूर्यकिरणांनी घेतला थोडासा विसावा
झगमगुन फुलला सोनसळी बहावा
आठवणींच्या कुपीत जपलेला
अचानक उभा ठाके बहरलेला
हा न माझा देश, ना माती जीवाची
तरीही मिठी दिठीची, अंतरंगाची नाती
सखीच्या मनीचा आला घेऊन सांगावा
स्मृतीगंधाने दरवळला अनिवार बहावा
पाकळी पाकळी फुललेली,हिरव्या पानात रमलेली
घोसा घोसातून ओथंबे, सळसळते झळाळी
रणरणत्या दुपारी कारंजी शिडकावा
उत्सव पिवळा, हळदी ओलावा
उन्मनित मन, उल्हसित तन
बहकलेला बहावा
7/13/2019
No comments:
Post a Comment