झूम करू बाई झूम करू
दिवसा रात्री झूम करू
खरे ग खरे गप्पांना बरे
न करेल त्याची उन्हात घरे।
नको तर नको कटकट गेली
नाहीतरी फारच टीव टीव केली
झूम करू बाई झूम करू
दिवसा रात्री झूम करू
कामाच्या meetings, पोरांची शाळा
मित्रांचा कट्टा, virtually खेळा
सोमवारी webinar, मंगळवारी zumba
बुधवारी training , गुरुवारी योगा
झूम करू बाई झूम करू
दिवसा रात्री झूम करू
खरे ग खरे गप्पांना बरे
न करेल त्याची उन्हात घरे।
शुक्रवारी हॅपी hour, शनिवारी कुकिंग क्लास
माहेरचे catch up, आणि सासरचा फार्स
पळतो कसा आठवडा कळतच नाही
करोना ने आमची वाट लावली बाई
झूम करू बाई झूम करू
दिवसा रात्री झूम करू
खरे ग खरे गप्पांना बरे
न करेल त्याची उन्हात घरे।
५/१५/२०२०
No comments:
Post a Comment