पाऊस गुडूप,
गाव चिडीचुडुप
थेंबांनी निथळणारं,
हिरवंगार झुडूप
दारात माऊ
पाऊस पाहू,
टीपटीप सरीत
चिंब होऊ
झऱ्याची झरझर
वाऱ्याची घरघर
ओसंडलेला
पाण्याचा पिसारा
ओल्या पंखांची
अंगानी भिरभिर
दाणेही ओले
फांदीत थरथर
पाण्याच्या धारा
सरसर सरा
छपरावर वाजे
तडतड तडा
पाऊस पहावा
मनी साठवावा
भिरभिरत्या विचारांना
देऊन विसावा
०३/०१/१९
No comments:
Post a Comment