त्याने चष्म्याच्या आडून तिच्याकडे हळूच पाहिले
तिचे डोळे चष्म्याच्या आत लुकलुक लुकलुकले
त्याने होऊन कावरेबावरे इकडेतिकडे बघितले
तिने खुद्कन हसून, गालाला खळी पाडत
डोळे मिचकावले
तो अजूनच कसनुसा होऊन,
चष्म्याची काडी दातात धरून चावू लागला
मग तर तिला अजूनच गम्मत वाटली
आणि हसू आवरून धरता धरता
तिचा चष्मा सटकून पडला
तो बावरला, भेदरला
बाप रे! कुणाला कळलं तर?
भराभर बॅकपॅकमध्ये वह्या कोंबून
थरथरत्या हाताने चष्मा नाकावर चढवून
तो वर्गाबाहेर पडला देखील
मग तिच्या मनमुक्त हसण्याने
सारा आसमंत भरून गेला
No comments:
Post a Comment