कोरड्या पडलेल्या आपल्या नात्याला
तडा जाण्याआधी थोडा ओलावा देऊ
स्नेहाचा, प्रेमाचा
एकमेकात गुंतूनही इतकी अलिप्तता
संवादातली औपचारिकता
तुटकपणा
स्पर्शाची संपलेली भाषा .
अजून आठवतो,
अंगी रोमांच उठवणारा तू आणि
रातराणी सारखी
मोहरून येणारी मी
आता दंतकथा वाटतात सगळ्या
विश्वास नाही बसत कधी कधी
खरेच पडलो होतो आपण प्रेमात
एकेकाळी ??
आता त्या प्रेमाचे भग्नावशेष
व्यवहाराच्या चौकटीत सजवून
नात्यांचे ऋण फेडतोय
असे का वाटते आहे?
No comments:
Post a Comment