कधी कधी ओळख नंतर होते
नाती जुनीच असतात
सात जन्मांतून फिरताना
कुठल्यातरी वळणावर भेटलो असू
बसलो असू निवांत
गळ्यात गळे आणि
मनात मन घालून
न बोलताही ….
तेव्हाही असंच वाटलं असेल
“ कधी भेटलो होतो पूर्वी आपण?
तुझा बाज, तुझा साज
खूपच ओळखीचा वाटतोय !”
बरं झालं, या जन्मी
भेटलो परत
मागच्या जन्मीच्या राहिलेल्या
गुजगोष्टी , सहवास,
चर्चा- कुचर्चा आणि नात्यांचे ऋण
थोडे तरी फिटेल.
मग परत भेटूच
पुढच्या जन्मी !!
No comments:
Post a Comment