नंग्या राजाचे
सोनेरी सिंहासन
नंग्या राजाचे
वडा-पाव जेवण
नंग्या राजाचे
नपुंसक मंत्री
पाणी घालायला
आंधळे संत्री
नंग्या राजाचे
भोंदू प्रशंसक
लाळघोटे, खोटारडे
लुच्चे आणि भंपक
राजाची गुर्मि
राजाची उर्मि
राजाचा जावई-मुले
तीही पापकर्मि
राजाची राणी
बसते मूग गिळून
शहाणी की खुळी
हसे कळून-नकळून
नंग्या राजाच्या
भानगडी हजार
लफडी, कुलंगडी
काही नाही सुमार
नंग्या राजाची
टिवटिव भारी
कदर नाही त्याला
खोटी की खरी
‘प्रकांड पंडितांची’
बाष्फळ बडबड
अर्थ लावायची
वांझोटी धडपड
नंग्या राजाची
हतबल प्रजा
आपल्या मूर्खपणाची
भोगतेय सजा भिंतीच्या हट्टापायी
केला प्रजेचा वांदा
पण राजाचा मात्र
मस्त चालतो धंदा
विरोधी राणीचा
वाढलाय जोर
नंग्या राजाला
अवघड जागी फोड
काय होईल?
कसे होईल ?
आज होईल?
की उद्या?
नंग्या राजाहाती
लोकशाहीच्या चिंध्या!
No comments:
Post a Comment