कामावरून घरी येऊन, हातात कॉफीचा वाफाळलेला कप घेऊन एकटीनेच बसायला तिला फार आवडतं.
कपाभोवती ओंजळ लपेटून कॉफीचा चटक लावणारा वास आणि कपाचा गरमपणा मुरवून घेत पुस्तक वाचणे,
फोनवरचे निरोप , पोस्ट्स वाचणे किंवा कधी कधी नुसतेच अंगणात बसून बाग निरखणे तिला सुखावून जाते .
संध्याकाळची कामे सुरु होण्याआधीचा निवांतपणा .

आज असंच घरी आल्यावर काहीतरी मराठी वाचावं असं वाटलं. मराठी पुस्तक वाचून घरी गेल्यासारखं वाटतं .
घरी म्हणजे पुण्याला. पुस्तकातला प्रत्येक शब्द जिवंत होतो आणि लाखो आठवणी दरवळतात. आज गुलजारचं पुस्तक
हाती पडलं. केव्हढी शक्ती आहे त्यांच्या प्रतिभेत ! मोजक्या, अचूक शब्दांनी शब्दचित्र रंगवतात.
कथेतली पात्र, त्यांच्या भावना आणि आजूबाजूचा माहोल शब्दांच्या चिमटीत पकडून अशा सोडून देतात की जीव चिरत जातो.
ती कॉफी आणि पुस्तक घेऊन बाहेर आली. आज आकाश जरा ढगाळ होतं , हवेत किंचित गारवा. बागेतली फुलं ऐन

बहरात. जाईचा दरवळ, गुलाबाचा मोहोरलेला लालिमा , जांभुळखुला लॅव्हेन्डर , सळसळणारी नवी पालवी,
किलबिलणारे पक्षी, वाऱ्याच्या मंद झुळका आणि येतो येतो म्हणून खुणावणारा पाऊस.
तिने एक खोलवर श्वास घेतला, कृतज्ञतेचा!
No comments:
Post a Comment