Post Language

Wednesday, January 8, 2014

गिधाड



माझा तुझ्याशीच काय
स्वतःशी पण दुरावा
जाता  येता भांडण
अबोला रुसवा
गर्भातून निघालेल्या आगीने
समुद्र ढवळून निघावा, तसा दिवस .
स्वतःच्या नखांचे व्रण
चाटत बसलेली रात्र .
काळ्या कभिन्न आसुरी विचारांचा डोंब,
विवेकाची धूळ उडवत
चौखूर  उधळलेले पिसाट मन
रक्ताळलेल्या जखमा चाटत,
भूतकाळाचं सडलेलं मांस
चिवडत बसलेलं गिधाड.
मीच मला ओळखू येत नाही आताशा
तर तुझी गोष्टच सोड
भीती वाटते आहे मला माझीच
अंधाऱ्या कोपर्यातल्या भूताने
कब्जा तर नाहीना केला?


No comments:

Post a Comment

About Me

Writing has been one of my hobbies since childhood. My poems and pros are a true expression of my thoughts and feelings at that time. My first language is Marathi, so you will find a lot of posts in Marathi. I am planning to add a few more posts monthly. You can subscribe by using your email address. Thanks for visiting!