तुझ्या न उच्चारलेल्या
शब्दांचा अर्थ लावता लावता
माझी दमझाक झाली
जळून खाक झालेल्या
माझ्या शब्दांची राख उचलताना
मनावर पडलेले डाग
आता कायमचेच
वाटेतला बारीक उंचवटा वाटला
त्याचा असीम पर्वत कधी झाला
तेच कळलं नाही
आता एका बाजूला तू
आणि दुसर्या बाजूला मी
स्वतःच्या दुखर्या जीवाला
जपत, चाचपत चालणारे
No comments:
Post a Comment