मी मलाच पडलेलं एक कोडं
१००० तुकड्यांच ….
टवका उडालेले, भेगा पडलेले
आपली जागा सोडून
भरकटलेले तुकडे
सरळ, वाकडे
उलथे, पालथे
स्वतःशीच हुज्जत घालत
स्वतःशीच हुज्जत घालत
जीव कुरतडणारे तुकडे
वाटलं होतं कि सोडवून झालय कोडं
कसं सुरेख, सुंदर दिसतंय चित्र
समाधानाचे आभास
अर्धामुर्धा श्वास
अपूर्णतेपासून अपूर्णतेकडे प्रवास
मी मलाच न उलगडलेलं
अतर्क्य, अबोध कोडं
No comments:
Post a Comment