मी निघून जाईन तेव्हा
माझ्या मृण्मयी देहाचा अर्क घेऊन
समुद्रावर जा.
शिशीरातल्या एखाद्या संध्याकाळी
जेव्हा सुर्य करेल आर्जव
उधळून सप्तरंग
पृथ्वी भोवति घालत पिंगा,
तेव्हा मला सोडून दे
त्या अथांग निळाईत
मग मी थोडे रंग चोरीन आभाळाचे
आणि चंद्राची गहेराई,
बनून जाईन छोटीशी शिंपली
चमचमती, धीट.
तू परत येशील जेव्हा
माझ्या आठवणीत दंग
तेव्हा हळूच एखाद्या फ़ेसाळ लाटेवरून
तुझ्या ओंजळीत येइन
तू म्ह्णशील
अशीच होती ती
फ़ेसाळती, चमकती, थोडीशी खुळपट
मग मी हसेन
पिटुकला मोती बनेन
No comments:
Post a Comment