Post Language

Wednesday, April 4, 2012

श्रीगणेशा

इतक्या वर्षांची साठलेली जळमटं काढून
कानाकोपरा स्वच्छ करायचाय
वळचणीत दबा धरून बसलेल्या
वांझोट्या स्वप्नांना
मुळापासून उपटून तडिपार करायचंय
उत्तरं नसलेल्या प्रश्नांचे गुंतवळे,
तळाशी साचलेला भूतकाळाचा गाळ,
वर तरंगणारा असुरक्षिततेचा तवंग
सगळं सगळं निपटून काढायचयं.

कोणी देईल का करून?
नुकत्याच जन्मलेल्या अर्भकासारखं
नितळ, आरस्पानी मन
नव्याने श्रीगणेशा करण्यासाठी.

No comments:

Post a Comment

About Me

Writing has been one of my hobbies since childhood. My poems and pros are a true expression of my thoughts and feelings at that time. My first language is Marathi, so you will find a lot of posts in Marathi. I am planning to add a few more posts monthly. You can subscribe by using your email address. Thanks for visiting!