तू कशाला टाकतोस उलटे फासे
मी कुठे तुझ्याशी शर्त लावली होती
थोडा हट्ट तुझा, थोडा माझा हेका
चल करु समझोता, उगा भांडावे किती
आता जरा कुठे पालवी फुटु लागली
तुझ्या ग्रीष्माची झळ सोसावी कशी?
दिवस सरता मागशील जमा-खर्च सारा
मला कुणी नफ्याची गणिते शिकवली होती?
दूरातून साद आली एका वेड्या गाण्याची
न ऎकण्याचे बहाणे करावे किती?
No comments:
Post a Comment