Post Language

Wednesday, April 4, 2012

तू-2

वार्‍याच्या झुळकेसारखा अलगद आलास
आणि माझं आयुष्य हलवून टाकलंस
तुला जाणून घेताना
तुझ्यातच इतकी गुंतले
की ’माझं ’ काही उरलंच नाही

मग तू वार्‍यासारखाच फिरलास
माझा गंध सोबत घेऊन.
आता कधी कधी भेटतोस,
कधी अनावर. कधी ह्ळुवार
कधी अलिप्त, कधी आतुर.

कसाही भेटलास तरी दरवेळी
तुझ्यात जास्तच गुरफटत जाते
आणि भेटत नाहीस तेव्हा,
माझातल्य़ा तुला जपत रहाते

No comments:

Post a Comment

About Me

Writing has been one of my hobbies since childhood. My poems and pros are a true expression of my thoughts and feelings at that time. My first language is Marathi, so you will find a lot of posts in Marathi. I am planning to add a few more posts monthly. You can subscribe by using your email address. Thanks for visiting!