आभाळाचा अडकेल श्वास
गळ्याशी दाटेल हुंदका
समुद्राची ऐकून गाज
तेव्हा फ़क्त तुझ्याचसाठी
मन तरंगेल वार्यावर
चंद्र बसेल डहुळलेला
पापणीच्या काठावर
हे असे तुझ्याशी कसले नाते
आरस्पानी पार्याचे
हे असे तुझ्याशी कसले नाते
न दिसणार्या गाण्याचे
No comments:
Post a Comment