पानगळ
वाळलेल्या हाडाच्या फांद्यांवरती
उरलेली दोन-चार पानं जपत
उभं होतं झाड
स्वत:शीच हसत
परवा आलेल्या राक्षसी वार्याने
लुटून नेलं त्याचं
सोनसळी वैभव
आता काही महिने असेच
भकास दिवस, बोचर्या रात्री
तटस्थ वैराग्य थकलेल्या गात्री
मग परत एकदा पोपटी चाहूल
अंगाअंगात सळसळेल
नव्या दमाने,नव्या आशेने
स्वप्न पुन्हा बहरेल
No comments:
Post a Comment