मनाच्या खोल कप्प्यामधे
एका छोट्याश्या कुपीत
सगळ्यांपासून लपवलेलं असतं
प्रत्येकाने एक गुपित
गुपित गर्द रानाचं
लवलवणार्या लालसेच्या
लालभडक रंगाचं
गुपित वेड्या गाण्याचं
ताल सोडून रंगलेल्या
बेभान खुळ्या मैफिलीचं
गुपित भूतकाळाचं
काळाकभिन्न फणा उभारून
डंख मारणार्या नागाचं
गुपित तिच्या खळीचं
आणि खळीमधे अडकलेल्या
घायाळ, काफीर दिलाचं
मनाच्या खोल कप्प्यामधे
एका छोट्याश्या कुपीत
अलगद जपलेलं असतं
प्रत्येकाने निदान एक तरी गुपित!
No comments:
Post a Comment