इतका सगळा करून विचार
शेवटी पदरात पडले काय?
पिकले केस, डोक्याला कहार
आपल्याच नाकात आपले पाय.
चर्चा-कुचर्चा, काथ्याकूट
धुसपुस आणि रडारड
दहा दगडांवर ठेवले हात
ह्याला सोड, त्याला पकड
पायपीट फुकटची, पडले घट्टे
इकडून तिकडे लोंबकाळणे
माझाच मला नाही पत्ता
सुटलेत कुठे उखाणे?
चाळीस वर्ष निघून गेली
हात अजून रिकामे
फुकटचे व्याप, नसते संताप
अस्वस्थ मनाचे रडगाणे
No comments:
Post a Comment