चिंध्या झालेले बालपण
झोळीत घेऊन
हताश खांदयांवर पेलत
मणामणाचे ओझे
तो असहाय बसला
त्याचा निशब्द आक्रोश
कानाचा पडदा फाड़ून गेला
मुक्या किंकाळी ने
जीव कातरला
माझा वांझोटा राग
पोटात ऊसळून
ओठामागे थांबणारा
मीही तितकीच असहाय्य
कायद्याची शृंखलेत बध्द
दिलासा देण्याची माझी
केविलवाणी धडपड
पर्याय शोधण्यासाठी
निरर्थक क्षटापट
अंतराला भेदणारी
पोकळ घालमेल
काय साधायचा
प्रयत्न करतेय मी ?
४/१९/२५
No comments:
Post a Comment