साही दिशांनी वेढून टाकणार्या भिंती.........
काही दृश्य, काही अदृश्य
निरागस चेहेर्याच्या, आपल्याश्या वाटणार्या भिंती
काही मी स्वतःच बांधत गेले,
माझ्या कल्पनांनी, तत्वांनी रचित गेले
पण आता जीव घाबरा, गुदमरू लागला
छोट्या छोट्या झरोक्यातून
बाहेरचं जग खुणावत राहिलं
इंद्र्धनुषी रंगांनी भुलवत राहिलं
आणि कोंदट भिंतीत
स्वप्न चिणत गेली........
No comments:
Post a Comment