माझ्या घरापासून हजारो मैलांवर
युद्धाचा रक्तपिपासू राक्षस थैमान घालतोय
आम्ही गुबगुबीत सोफ्यावर बसून
पॉपकॉर्न खात बघतोय
अजून एक reality show!
एका महासत्तेने दूसर्या सत्तांधाचे
उलथवून टाकलेले सिंहासन,
दोन्ही हात आणि सर्व कुटुंब
गमावलेल्या मुलीचे असहाय डोळे,
पोटची पोर मेलेल्या आईवडिलांचा
वांझोटा आक्रोश,
उन्मळून पडलेल्या अजस्त्र पुतळ्याखाली
चिरडलेले निरपराध जीव......
माझ्या दारात वसंताची चाहूल
नुकतेच गुलाब फुलू लागलेत,
जगाच्या दुसर्या टोकाला
घरं आणि माणसं पेटलीयेत..
No comments:
Post a Comment