सत्य आणि आभासाच्या
सीमारेषा पुसून टाकणारं आकाश
घनभरल्या डोळ्यांनी खुणावणारा तू
का नुसताच भास ?
रक्तातून वहाणारे काहीबाही
मदिरमय वार्याचे बेहोश पदन्यास
थेंबाथेंबांनी बिलगणारा पाउस
मनाचा उमलता प्राजक्त
आसुसलेल्या ओठांवरती
ओथंबलेली एक रात्र
No comments:
Post a Comment