सगळे दिवस सारखे नसतात
काही दिवस पार्यासारखे
बघता बघता उडून जातात
काही हट्टी मुलासारखे
दारात फतकल मारून बसतात
काही वादळवार्यासारखे
पाळंमुळं उखडू बघतात
काही जुन्या मैत्रिणीसारखे
गळ्यात गळा घालून फिरतात
काही उगाच कट्ट्यावरती
पाय हलवत वेळ काढतात
काही बांधून घड्याळाला
गोल गरगर चकरा मारतात
सगळे दिवस सारखे नसतात
रात्रींचं मात्र तसं नाही
एखादी रोलरकोस्टर
बरेचदा सपाट भुई !!
No comments:
Post a Comment